Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Virus - Pune S01E04

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 4 - Virus

    Unabridged

    49 min

    संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E06

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 6 - Virus

    Unabridged

    43 min

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E05

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 5 - Virus

    Unabridged

    43 min

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus - Pune S01E08

    by Daniel Åberg ...
    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 8 - Virus

    Unabridged

    45 min

    सुपरमार्केटमध्ये अचानक झालेल्या स्फोटातून मायरा अगदी थोडक्यात बचावलीय. बाहेर प्रत्येक पावलावर असणाऱ्या धोक्यांमुळे ते सगळे शिवण्यातल्या एका फर्निचरच्या मॉलमध्ये लपतात. काही खायला मिळतंय का हे पाहायला दिव्या जवळच्या एका गोदामात जाते. नेमकं तेव्हाच एका मिलिट्री ट्रकमधून दोन शस्त्रसज्ज माणसं तिथं येऊन धडकतात. दिव्या त्यांच्यापासून वाचेल की त्यांच्या तावडीत सापडेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E03

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 13 - Virus

    Unabridged

    47 min

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E06

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 16 - Virus

    Unabridged

    43 min

    मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E02

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 12 - Virus

    Unabridged

    46 min

    मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E01

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 11 - Virus

    Unabridged

    37 min

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E04

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 14 - Virus

    Unabridged

    43 min

    मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E07

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 17 - Virus

    Unabridged

    42 min

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E09

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 19 - Virus

    Unabridged

    42 min

    गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Virus Pune S02E10

    Narrated by Mukta Barve ...
    Series Audiobook 20 - Virus

    Unabridged

    47 min

    डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं? ... Read more

    $3.99 USD